HW Marathi
देश / विदेश

आता अवघ्या चार तासांमध्ये उपलब्ध होणार पॅनकार्ड

नवी दिल्ली | पॅनकार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत किचकट असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन पॅनकार्ड उपलब्ध व्हायला किमान १० ते १५ दिवस जातात. आता मात्र पॅन कार्डसाठीची ही प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे. “पॅनकार्ड काढणे सुलभ व्हावे यासाठी प्राप्तिकर विभाग एक नवी प्रणाली घेऊन येत आहे. या प्रणालीमुळे वर्षभरानंतर आम्ही केवळ ४ तासांमध्ये पॅनकार्ड देण्यास सक्षम होऊ,” असे सुशील चंद्रा यांनी सांगितले.

नव्या प्रणालीमुळे आता अर्ज केल्यानंतर केवळ ४ तासांमध्येच पॅनकार्ड उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्र यांनी दिली आहे. सुशील चंद्रा हे दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलत होते. पॅनकार्ड काढण्यासाठीच्या नव्या प्रक्रियेमुळे आता अत्यंत कमी वेळात म्हणजेच केवळ ४ तासांमध्ये पॅनकार्ड मिळणार आहे. देशांत आता सर्व आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ही नवी प्रक्रिया अत्यंत सोयीची ठरणार आहे.

Related posts

कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रपती ट्रम्प संतप्त 

News Desk

केंद्राचा मोठा निर्णय, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण

News Desk

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

News Desk