HW News Marathi
देश / विदेश

आता आरबीआय २० रुपयांची नवी नोट चलनात आणणार

नवी दिल्ली | काहीच दिवसात तुमच्या हातात आणखी एक नवी नोट येणार आहे. कारण, भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, २० रुपयांची नवी नोट चलनात येणार असली तरी जुनी नोट देखील चलनात कायम राहणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, केंद्रीय बँकेच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रुपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अरब इतकी होती. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या १० अरबपर्यंत पोहोचली. देशातील एकूण चलनात २० रुपयांच्या नोटांची संख्या ९.८% इतकी आहे. २० रुपयांची ही नवी नोट जुन्या नोटेपेक्षा आकाराने २० टक्के छोटी असणार असून या नोटेवर अजिंठा गुहेचे चित्र असू शकते. त्याचप्रमाणे, २० रुपयांच्या या नव्या नोटेवर अतिरिक्त सुरक्षा फीचर्स असणार आहेत, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.

मोदी सरकारकडून ८ नोव्हेंबर २०१६ साली करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर चलनातील अनेक नोटा पुन्हा नव्या रूपात चलनात आणल्या गेल्या आहेत. आतापर्यंत १०, ५०, १००,५००, २०००, २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या सर्व नोटा महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या आहेत. नोटबंदीनंतर बाजारात येणारी ही सातवी नोट ठरणार आहे. या नोटांचा आकार, रंग हे जुन्या नोटांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे आहेत. दरम्यान,आता येणारी २० रुपयांची नवी नोट कशी असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणं, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारणं हीच खरी आदरांजली !

News Desk

५ एप्रिलला रात्री ९ वाजता लाईट बंद करून दिवे लावा !

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk