HW News Marathi
देश / विदेश

आता सरकार बेरोजगारांच्या खात्यात जमा करणार पैसे

नवी दिल्ली | केंद्र सरकार आता आपली नोकरी गमावून बेरोजगार झालेल्या व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे. कर्मचारी विमा अर्थात ‘एसिक’ अंतर्गत येणा-या सर्व कर्मचा-यांसाठी ही आनंदवार्ता आहे. त्याचप्रमाणे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना काही कारणास्तव कामावरून कमी केले किंवा इतर काही कारणाने त्यांची नोकरी गेली तरी त्यांना सरकारकडून तीन महिन्यांचा पगार दिला जाणार आहे.

केंद्र सरकारने अल्पबचत खात्यांतील गुंतवणुकीवरील व्याजदरात ०.४ टक्के अशी भरघोस वाढ केली आहे. या निर्णयामुळे पीपीएफ, एनएससी (राष्ट्रीय बचत पत्र) आणि किसान विकास पत्रांत गुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार आणि नोकरदारांना मोठा दिलासा लाभणार आहे. पीपीएफ खात्यांना ८.० टक्के व्याजदर दिला जाणार आहे.

देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्याची स्वप्नेदेखील मोदी सरकारने सामान्यांना दाखविली होती आणि आता बेरोजगार असणाऱ्या व्यक्तींच्या खात्यात केंद्र सरकार पैसे जमा करणार आहे. जर ‘एसिक’अंतर्गत येणा-या कर्मचा-याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला १५ हजार रुपये सरकार देणार आहे. या आधीच्या रकमेत ५ हजारांची वाढ झाली आहे.

योजना नेमकी काय ?

बेरोजगारांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी सरकारने ‘अटल विमा व्यक्ती कल्याण योजना ’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार नोकरी गमावलेल्यांना नवी नोकरी मिळेपर्यंतच्या मधल्या काळात सरकार पैसे देणार आहे. हे पैसे थेट त्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. कर्मचारी विमा योजनेतील म्हणजेच ‘एसिक’ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच हा लाभ घेता येईल.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

News Desk

“…याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं जाहीर ‘आभार’ पत्र

News Desk

भाजपला पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा मिळवण्यात यश

News Desk