HW News Marathi
देश / विदेश

आता तेजस एक्सप्रेसचा वेग आणखी वाढणार

मुंबई | मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ‘तेजस’ एक्स्प्रेसची प्रति तास ११० किमी वेगाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. वेगाच्या चाचणी रवाना झालेली तेजस एक्सप्रेस ही नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर मडगाव स्थानकात पोहोचली आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रवासातल्या अर्धा तास कमी होणार आहे. सीआरएसची (रेल्वे सुरक्षा आयोग) मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांना प्रत्यक्षात तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करता येणार आहे.

तेजस एक्स्प्रेस चाचणीदरम्यान शुक्रवारी सकाळी ५ वाजून ०४ मिनिटांनी सीएसएमटीहून रवाना होऊन रोहा स्थानकात बरोबर ७ वाजून २७ मिनिटांनी पोहोचली. तेजस एस्प्रेस रेल्वेच्या वेळापत्रकाच्या १३ मिनिटे आधीच रोहा स्थानकात पोहोचली होती. तर पुढे मडगाव स्थानकात तेजस एक्सप्रेस १ वाजून ३५ मिनिटांनी म्हणजेच तब्बल ३० मिनिटे लवकर पोहोचली आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार मडगाव स्थानकात तेजस २ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

swarit

CBSE बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत टळली

News Desk

पाकिस्तानकडून हाफीज सईदवर धार्मिक उपदेश करण्यास बंदी

News Desk