HW Marathi
देश / विदेश राजकारण

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

नवी दिल्ली। संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्यात येणार, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल ( २० नोव्हेंबर) संसदेत केली. राज्यसभेत अमित शहा यांनी एनआरसीबाबत विरोधकांच्या प्रशांना उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच, कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’ असेही शाह यावेळी म्हणाले. आसाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून १९ लाख लोकांना देशा बाहेर करण्यात आले आहे.

देशात बेकायदेशीररित्या शीरून राहणाऱ्या विरोधात एनआरसी आहे, असे शाहांनी राज्यसभेत सांगितले.  देशभरात ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’ लागू करणार असल्याचे माहितीशाह यांनी काल स्पष्ट केले आहे. देशात आधीच एनआरसी विरोधात वातावरण तापलेले आहे. यावरू विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. तर, कोणासोबतही भेदभाव केला जाणार नसून देशाचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्याला देशात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. शाहांच्या काल संसदेत झालेल्या उत्तरावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे.

एनआरसी आणि सिटीजनशिप ही दोन्ही विधयके वेगवेगळी असून विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अमित शाह यांनी राज्यसभेत उत्तर देताना विरोधकांवर केला. एनआरसी हे धर्माच्या आधारावर केले जाणार नाही. जे भारताचे नागरिक आहेत, त्यांना एनआरसीमध्ये जागा मिळणार आहे. तर, सिटीजनशिपबद्दल बोलताना गृहमंत्री शिख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारसी या धर्मातील शरणार्थींविषयी बोलताना मुस्लीमांचे नाव का टाळतात, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार, सैयद नासिर हुसैन यांनी विचारला. संविधानात सर्व धर्मियांना समान अधिकार दिलेला असताना मुस्लीमांना त्यांचा अधिकार का मिळत नाही?, असाही प्रश्न हुसैन यांनी उपस्थित केला.

अमित शाह म्हणाले, हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी हे शरणार्थी पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तान सारख्या मुस्लीम बहुल देशातील आहेत. जिथे हे लोक अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात. तर, मुस्लीम हे त्या देशातील बहुसंख्य आहेत आणि सरकार असे मानते की मुस्लीम या देशांमध्ये सुरक्षित आहेत. म्हणूनच आम्ही मुस्लीमांचा उल्लेख करत नाही.

Related posts

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

अपर्णा गोतपागर

आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे !

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर

News Desk