HW News Marathi
देश / विदेश

Union Budget 2021 |  जुन्या वाहनांचा फिटनेस आता तपासला जाणार

नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले.

२९ जानेवारी पासून सुरु झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडून सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले आहे. या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –

जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद

कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स उभारणार.

आवश्यक सर्व सुविधांसह येत्या तीन वर्षात सात टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाईल.

देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद.

पश्चिम बंगालमध्ये रस्ते प्रकल्पासाठी 25 हजार कोटींच्या निधीची तरतूद

सडक परिवहनासाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपये

केवळ तीन वेळा अर्थसंकल्पानंतर अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली आहे.

यावेळी पूर्वीपेक्षा वेगळी स्थिती जागतिक महामारीमुळे निर्माण झाली.

अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याची आणि शाश्वत विकासाची पुरेपूर संधी देत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिका आर्थिक संकटात

swarit

शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील !

News Desk

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात

Aprna