HW Marathi
देश / विदेश

सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी

नवी दिल्ली | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कार्यालयात आज (९ फेब्रुवारी) तिसऱ्या दिवशी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरु आहे. मिळालेला माहितीनुसार, रॉबर्ट वाड्रा यांना ३० ते ४० प्रश्न विचारले जाऊ शकतात. याआधी दिल्लीतील जामनगर येथील ईडीच्या कार्यालयात ६ फेब्रुवारीला तब्बल ६ तास तर ७ फेब्रुवारीला ९ तास रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी झाली. आज सकाळी पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. रॉबर्ट वाड्रा चौकशीदरम्यान सहकार्य करत नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे.

Related posts

अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे आयएसआय !

News Desk

खुशखबर ! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात

News Desk

भारत-पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द

अपर्णा गोतपागर