HW News Marathi
देश / विदेश

कलबुर्गी हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून एकाला अटक

बेळगाव | ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एसआयटीने एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे नाव प्रवीण प्रकाश चतूर (२७) असे असून तो शहापूरचा रहिवासी आहे. प्रवीणला धारवाड न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रवीला सहा महिन्यांपूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र, त्याची चौकशी करून सोडून देण्यात आले होते. आज एसआयटीने चतूरला पुन्हा अटक केली असून त्याला धारवाड न्यायालयात हजर करण्यात आले. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ रोजी धारवाडच्या कल्याण नगरमध्ये त्यांच्या घराजवळ हत्या झाली होती. दुचाकीवरून आलेल्या बंदुकधारी व्यक्तींनी गोळ्या झाडून डॉ. कलबुर्गी यांची हत्या केली होती. कलबुर्गी यांनी मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असे याप्रकरणात याआधी अटक केलेल्या आरोपीने सांगितले होते.

जून २०१४ मध्ये अंधश्रद्धाविरोधी विधेयकाबाबत चर्चा सुरु होती. तेव्हा कलबुर्गी यांनी लेखक यू.आर.अनंतमूर्ती यांच्या लेखनाचा संदर्भ देत मूर्ती पूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या वक्तव्यामुळे कलबुर्गी यांना हिंदूविरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, असे आरोपीने सीआयडीला तपासादरम्यान सांगितले होते.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | जाणून घ्या…“ऐ मेरे वतन के लोगो…” या हृदयस्पर्शी गीताचा इतिहास

News Desk

राहुल गांधींनी दाखवला फिटनेसचा दम, ९ सेंकदात १३ पुशअप्स!

News Desk

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk