HW Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी

श्रीनगर |  श्रीनगर-जम्मू महामार्गावर बनीहाल येथे सीआरपीएफवर आज (३० मार्च) ताफा जात असताना कारमध्ये स्फोट सॅन्ट्रो कारमध्ये स्फोट झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुलवामा येथे स्टेट बँकेजवळील सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले असून त्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्याजवळ आज (३० मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. सीआरपीएफ ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या माहितीनुसार, सॅन्ट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परंतु सीआरपीएफच्या गाडीचे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

 

Related posts

योगी-मोदींचा नऊ दिवस उपवास

News Desk

कोणी केली केरळला अर्थिक मदत, जाणून घ्या…

News Desk

स्वातंत्र्य ही काश्मिरी जनतेची प्राथमिक मागणी | सैफुद्दीन सोझ

News Desk