HW News Marathi
देश / विदेश

गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर भाजपला धक्का

पणजी | भाजप प्रणित एनडीएला गोव्यातून मोठा धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक झाली होती. यामध्ये एनडीएबाहेर पडण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) हा गोवा राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष आहे. त्याचे नेतृत्व विजयी सरदेसाई करत आहेत. २५ जानेवारी २०१६ला सरदेसाईंनी गोवा फॉरवर्ड पार्टीची स्थापना केली होती. २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत जीएफपीने चार उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे यापैकी ३ जागांवर पक्षाला विजय मिळाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

Aprna

आंदोलनावेळी शतकऱ्यांचे झालेले मृत्यू नसून त्या हत्याच – संजय राऊत

News Desk

‘स्वातंत्र्याची जाणीव करून देणं हे देश उलथवून टाकणं झालं आहे का?’, राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk