तिरुवनंतपुरम | जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात आढळून आला आहे. हा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला असून केरळमध्ये चीनहून परतलेल्या एका विद्यार्थ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा विद्यार्थी चीनच्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत करोना व्हायरसने १७० जणांचा बळी घेतला आहे.
Update on Novel #Coronavirus: one positive case reported in #Kerala.#nCoV2020.
Read the details here:https://t.co/hYknfIKQiY@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @DDNewslive @airnewsalerts @ANI
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) January 30, 2020
कोरोना या विषाणूच्या विळख्यात चीनमध्ये शिकणाऱ्या २७ भारतीय सापडले आहे. यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. हे विद्यार्थी सीयानीगमधील हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. भारतातून तब्बल २३ हजार विद्यार्थी चीनमध्ये शिकायला जातात, त्यातील २१ हजार वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवतात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.