HW News Marathi
देश / विदेश

एकच रेशन कार्ड संपूर्ण देशात चालणार

नवी दिल्ली | तुम्ही तुमचे रेशन कार्ड आता देशातील कोणत्याही शिधावाटप दुकानात चालवू शकता.. ज्याप्रमाणे मोबाइल फोनचा नंबर न बदलता कंपनी बदलून पोर्टेबिलिटी करता येते. त्याचप्रमाणे आता आपण रेशन कार्ड देखील पोर्टेबिलटी करु शकतो. म्हणजे पुर्वी तुम्ही एक राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर आधीचे कार्ड रद्द करुन नव्या ठिकाणी नवे कार्ड काढावे लागत होते. पण, आता तसे न करता एकच राशन कार्ड देशभरात चालविण्यात येणार आहे.

यासाठी सरकार सार्वजनिक वितरण प्रणालीवर एकीकृत व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) यावर काम करत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये रेशन कार्डची पोर्टेबिलटी लागू केली गेली आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यात ही व्यवस्था सध्या उपलब्ध आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीत आयएम-पीडीएम नावाची ही योजना लागू होईल. या योजनेसाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. यामुळे डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याचे कामही यात केले जाईल. या योजनेसाठी पीडीएम वेब आणि मोबाइल अँप्लिकेशन देखील तयार करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला

News Desk

काश्मीरमधील राजौरीत आयईडीचा भीषण स्फोट

News Desk

#NirbhayaCase : दोषी पवन गुप्ताची क्युरेटीव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

swarit