HW News Marathi
Covid-19

अवघ्या तासात रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंग २० जूनपर्यंत गाड्या फुल्ल

मुंबई | केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने १ जूनपासून देशातील विविध मार्गावर ज्या २०० रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आजपासून (२१ मे) ऑनलाईन सुरू झाले. या गाड्यांना एसी, नॉन एसी आणि जनरल सेकंड क्लासचे कोच असणार असून त्याचे तिकिटदर देखील असणार आहेत. प्रवासी गाड्यांचे ३० दिवस आधी आरक्षण करु शकतात. ऑनलाईन बुकिंगमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २० जूनपर्यंत गाड्या फुल्ल झाल्या.

तसेच या गाड्यांमध्ये दिव्यांग आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. आरक्षित तिकिट असलेले प्रवासीच या गाड्यांमधून प्रवास करु शकतात. गाड्यांमध्ये प्रवाशांना अन्नपदार्थ, ब्लॅंकेट वगैरे पुरविण्यात येणार नाही. या गाड्यांमध्ये मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या वेळापत्रकानुसारच धावणार असून त्यांचे थांबेही पूर्वीप्रमाणेच असणार आहेत.

 

मुंबईतून ‘या’ ट्रेन सुटणार

  • ०१०१६-१५ एलटीटी-गोरखपुर कुशीनगर एक्स्प्रेस
  • ०१०१९-२० एलटीटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
  • ०१०६१-६२ एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस
  • ०१०७१-७२ एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस
  • ०१०९३-९४ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
  • ०११३९-४० सीएसएमटी- गडग एक्स्प्रेस
  • ०१३०१-०२ सीएसएमटी-केएसआर बॅगलुरु उद्यान एक्स्प्रेस
  • ०२४७९-८० बांद्रा टर्मिनस-जोधपुर सुर्यनगरी एक्स्प्रेस
  • ०२५३३-३४ सीएसएमटी-लउनऊ पुष्पक एक्स्प्रेस
  • ०२७०१-०२ सीएसएमटी-हैद्राबाद हुसेनसागर एक्स्प्रेस
  • ०२८१०-०९ सीएसएमटी-हावडा मेल
  • ०२९०३-०४मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल
  • ०२९२६-२५बांद्रा टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस
  • ०२९३३-३४ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद कर्नावती एक्स्प्रेस
  • ०६३४५-४६ एलटीटी-तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस
  • ०२९५५-५६ मुंबई सेंट्रल-जयपुर एक्स्प्रेस
  • ०३२०१-०२ एलटीटी-पटना एक्स्प्रेस
  • ०२१४१-४२ एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस
  • ०९०४१-४२ बांद्रा टर्मिनस-गाजीपुर एक्स्प्रेस
  • ०२५४१-४२ एलटीटी-गोरखपुर एक्स्प्रेस
  • ०२१४९-५० पुणे-दानापुर एक्स्प्रेस
  • ०५६४५-४६ एलटीटी-गुवाहाटी एक्सप्रेस जनशताब्दी एक्स्प्रेस
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

News Desk

कोरोनामुळे राज्यातील 70 हजार जागांच्या नोकर भरतीला स्थगिती

News Desk

धारावीत २५ नवे कोरोनाबाधित, एकूण आकडा १३७८ वर

News Desk