HW News Marathi
Covid-19

सेंट्रल विस्टाचं काम थांबवा, १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना पत्रं

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने देशातील १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून विरोधकांनी मोदींना कोरोनाच्या संकटामुळे सेंट्रल विस्टाचं काम थांबवण्यासह काही सल्ले दिले आहेत.

विरोधकांनी कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्रं लिहिलं आहे. त्यामुळे नक्कीच मोदींची कोंडी होण्याची शक्यता आहे. येत्या काळात कोरोनाची स्थिती नियंत्रणात न आल्यास विरोधक अधिकच आक्रमक होण्याची चिन्हेही या निमित्ताने दिसत असल्याचं दिसून येत आहे.

विरोधकांच्या मागण्या काय आहेत?

>> जिथून शक्य होईल तिथून लस खरेदी करा, मग ती देशातून किंवा विदेशातून

>> संपूर्ण देशात तात्काळ व्यापक लसीकरण सुरू करा

>> देशांतर्गत लसीकरणासाठी आवश्यक लायसेंसिंग लागू करा

>> लसीकरणासाठी 35 हजार कोटींचा बजेट ठेवा

>> सेंट्रल विस्टा प्रोग्राम थांबवा. त्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा

>> पीएम केअर फंड आणि सर्व खासगी फंडासाठी फंडातील सर्व जमा रक्कम बाहेर काढा आणि त्यातून ऑक्सिजन तसेच मेडिकल उपकरणे खरेदी करा

>> बेरोजगारांना ६ हजार रुपये दरमहा भत्ता द्या

>> सर्व गरजूंना मोफत अन्नधान्य द्या

>> महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतीकामाकडे लक्ष देता यावे म्हणून कृषी कायदा मागे घ्या

कोणी कोणी लिहिलं पत्र?

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, जेडीएसचे नेते एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, डीएमके नेते एमके स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, सीपीआय नेते डी. राजा आणि सीपीआयचे नेते सीताराम येचुरी आदींच्या या खुल्या पत्रावर सह्या आहेत. या पत्रात मोफत लसीकरण करणे, सेंट्रल विस्टा प्रकल्प बंद करणे आणि त्याचा पैसा आरोग्य व्यवस्थेवर लावणे तसेच बेरोजगारांना ६ हजार रुपये मासिक भत्ता देणे आदी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 1.0 | मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी

News Desk

राज्यात आज ११,१११ नवे रुग्ण आढळले तर ८८३७ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

News Desk