HW News Marathi
देश / विदेश

सोमनाथप्रमाणे अन्य मंदिरे वेळीच न उभारल्याने दहशतवाद वाढला !

मुंबई | “राममंदिरासाठी असणारा संघर्ष आताचा नाही तर १५५८ साली बाबराने मंदिर पाडले तेव्हापासून सुरू आहे. सोरटी सोमनाथ, काशीचे विश्‍वनाथ मंदिर, मथुरेतील कृष्णजन्मस्थान या सर्वच धार्मिक स्थळांसाठी, येथील आस्था-राष्ट्रीय अभिमान टिकवण्यासाठी आपण संघर्ष करत आलो आहोत. वास्तविक, सोमनाथाच्या पार्श्‍वभूमीवर अन्य मंदिरे उभी राहिली असती तर परदेशी आक्रमकांना त्यातून योग्य संदेश मिळाला असता व हल्ला करण्याचे साहस त्यांनी केले नसते. यामुळे भारतात दहशतवादही बळावला नसता, हल्लेही झाले नसते. पण वेळोवळी योग्य ती कारवाई घेणे टाळले गेले व त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आलो आहोत”, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले.

विश्‍व हिंदू परिषदेद्वारा आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. “कोट्यवधी हिंदूंच्या आस्था राम मंदिराशी जोडलेल्या आहेत. त्यासाठी कित्येकांनी बलिदान दिले आहे. सोळा कोटी हिंदूंनी मंदिरासाठी आंदोलन केले आहे. याकूब मेननच्या केससंदर्भात रात्री दोन वाजता तर एका मोठ्या नेत्याच्या अंत्यसंस्कारांचे स्थळ निश्‍चित करण्यासाठीही पहाटे चार वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले गेले. राममंदिर प्रश्‍नाबाबत मात्र दिरंगाई होत आहे. हिंदूंच्या भावनांचा सन्मान करून सुप्रीम कोर्टाने तातडीने निर्णय घ्यावा व केंद्र सरकारने त्याबाबत कायदा करावा. त्यासाठी आवश्यक तेवढा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.” असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे धोरण हे कायमच तुष्टीकरणाचे राहिले आहे असे स्पष्ट करताना ते म्हणाले, 1947 पासून कायमच काँग्रेसने मुस्लीमधार्जिणे राजकारण केले आहे. भारतीय आस्था नाही तर बाबर, गझनी, औरंगजेब हेच त्यांचे आदर्श राहिले आहेत. बाबर हा ज्यांचा आदर्श असेल ते भारताशी कधीही जोडले जाऊ शकत नाहीत. ते कायमच जिहादच्या मार्गाने जात राहतील. विद्यमान सरकार लवकरच निर्णय घेईल व मंदिर बांधले जाईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अ‍ॅक्टिव्हिस्ट नाही, अनार्किस्ट

शबरीमाला अय्यप्पा मंदिरप्रवेशाबाबत प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, ज्या अ‍ॅक्टिव्हिस्ट महिला मंदिरप्रवेशाबाबत आग्रही आहेत. वास्तवात त्या अ‍ॅक्टिव्हिस्ट नसून अनार्किस्ट अर्थात अराजकतावादी आहेत. त्या अयप्पाप्रती असणार्‍या आस्थेपायी नव्हे तर त्या आस्थेची थट्टा उडवण्यासाठी तेथे जात आहेत. त्या त्या ठिकाणच्या आस्था तेथील स्थानिक समाजच तयार करत असतो. आस्थेचा विषय न्यायपालिकेशी जोडलेला नसून लोकभावनेशी जोडलेला आहे.

नामांतरण फक्त आक्रमकांच्या नावाचेच

एखाद्या व्यक्तिचे वा स्थळाचे नाव येथील आक्रमकांवरून ठेवले जात असेल तर त्याला आपला विरोध असल्याचे जैन म्हणाले. नामांतरणाचा हा प्रश्‍न धर्माशी नसून आस्थांशी जोडलेला आहे. ज्या स्थळांना आक्रमकाचे नाव दिले असेल ते बदलण्याबाबत आपला आग्रह कायम असेल असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : देशात रुग्णांचा आकडा १९९ वर, तर राज्यात रुग्णांची संख्या स्थिर

swarit

सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, हाथरस प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

News Desk

घरगुती गॅस सिलिंडच्या किंमती आजपासून वाढ

News Desk