न्यूयॉर्क। “आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानला दहशतवादवरून खडेबोल सुनावले. विरोधात जगाला जागरुक करण्याचे काम करत केले. दहशतवाद हा एका देशात नाही तर संपूर्ण जगभरात असून दहशतवाद मानवतेला सर्वात जास्त आव्हानांपैकी एक असल्याचे भारताचे पंतप्रधान मोदी यांनी काल (२७ सप्टेंबर) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सांगितले आहे.
India is the country that has made the biggest sacrifice at the UN Peacekeeping Mission.
Our country has given the world Gautam Buddha, and a message of peace, not war.
That is exactly why we have seriousness and anger in our voice against global terrorism: PM Modi #PMModiAtUN pic.twitter.com/Dd4z9WCRwj
— BJP (@BJP4India) September 27, 2019
दहशतवाद आज मानवजातीसमोरील आणि जगासमोरील मोठे आव्हान आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले. यावेळी मोदींनी भारताचा इतिहास, परंपरा, सरकारने केलेली विकास कामे, पर्यावरण यावर बोलणे पसंत केले. तसेच दहशतवादविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन करत मोदींनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी संयुक्त सभेच्या ७४ व्या सभेत बोलत होते.
तसेच जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारतात पार पडले आहे. संयुक्त राष्ट्र संघात मनोगत व्यक्त करण्याची संधी विशेष आहे. कारण संपूर्ण जग महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करणार असल्याचे देखील मोदींनी सांगितले. जगाने २०३० पर्यंत टी.बी. पूर्णपणे नष्ट करण्याचे ठरवले आहे. पण भारताने २०२५ मध्येच टी.बी. मुक्त करण्याचे उद्देश ठेवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.