HW News Marathi
देश / विदेश

हे काही पंतप्रधानपद नाही…शरद पवारांच्या यूपीए अध्यक्ष पदावरून पी चिदंबरम यांचे वक्तव्य!

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्यासंबंधी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार यांची युपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. “हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची युपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी,” असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते विरोधी नेत्यांची भेट घेतील. दरम्यान शरद पवार यांनी दिल्ली दौऱ्याआधी न्यूज १८ शी बोलताना युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचं वृत्त फेटाळलं आहे. “माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल पंपावर मोदींचा तोंडाबरोबरच डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा !

News Desk

उन्नाव बलात्कार प्रकरण उत्तर प्रदेशाबाहेर चालविले जाणार

News Desk

Live Update : पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतीय सैन्याने पाडले

News Desk