नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाईट्स बंद करुन मेणबत्या, टॉर्च लावायचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनावर देशभरातून टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही साथीच्या आजाराचे तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ काय म्हणतात ते ऐकावे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींना चिदंबरम यांनी प्रतिआवाहन केले आहे.
Dear @narendramodi,
We will listen to you and light diyas on April 5. But, in return, please listen to us and to the wise counsel of epidemiologists and economists.— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 3, 2020
दरम्यान, राजकीय वर्तुळात अनेकांनी मोदींच्या या आवाहानावर टीकास्त्रच सुरु केले आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही पंतप्रधानांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘विषाणूचा प्रसार रोखणे, तपासणी किट्स, गरिबांना जेवण पोहोचवणे, गरीब-मजुरांना आर्थिक मदत करणे अशा मुद्द्यांवर काहीही ऐकायला मिळाले नाही. दिवा हा एखाद्या उद्देशासाठी पेटवा, अंधश्रद्धेसाठी नाही,’ अशी टिका सिब्बल यांनी केली आहे.
Modiji
Learnt nothing about government’s steps to
1) contain the virus
2) protect our medical practitioners
3) provide testing kits
4) reach food and supplies to the poor
5) finance migrant labour , the joblessLight the ‘ Diya ‘ of reason
Not that of superstition !— Kapil Sibal (@KapilSibal) April 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.