मुंबई | कर्नाटकमधील दुर्गम भागांमध्ये जाऊन महिलांची प्रसूती करणाऱ्या पद्मश्री विजेत्या सुलागिट्टी नरसम्मा (९८) यांचे निधन झाले आहे. सुलागिट्टी यांचे आज (२५ डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. सुलागिट्टी या जननी अम्मा म्हणून त्यांना ओळखले जात होते. कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात जन्माला आलेल्या नरसम्मा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात १५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती केली होती. येथील दुर्गम भागात पाऊस, हिंस्त्र श्वापद यांची परवा न करता.
Padma Shri awardee Sulagitti Narasamma passes away at the age of 98 years in Bengaluru. She had helped deliver more than 15,000 babies in Krishnapura, a remote village in Pavagada taluk in Karnataka. pic.twitter.com/QYvPHazyH2
— ANI (@ANI) December 25, 2018
नरसम्मा गरोदर महिलेची सुखरूप सुटका करण्यासाठी जायच्या. त्यामुळे येथील आदिवासी त्यांना जननी अम्मा म्हणून संबोधित केले आहे. सामाजिक क्षेत्रात अतुलनिय योगदान दिल्याबद्दल त्यांना सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरवले होते. कुठल्याही वैद्यकिय मदतीशिवाय त्या महिलेची प्रसूती करायच्या. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. तुमकुर विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.