कोच्ची | देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराची संपत्ती २ लाख कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या माजी राजघराण्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती मंदिराची व्यवस्था पाहणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
२०११ साली केरळ उच्च न्यायालयाने पद्मनाभस्वामी मंदिराच्या हक्क आणि संपत्तीबाबत निर्णय देण्याचा अधिकार राज्य सरकारला अधिकार दिला होता. केरळ हायकोर्टाच्या या आदेशास माजी त्रावणकोर राजघराण्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ८ वर्षापेक्षाही अधिक काळ सुनावणी सुरू होती. एप्रिलमध्ये या प्रकरणातील झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती ललित आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला होता. मात्र, अखेर सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोर घराण्याला दिली आहे.
We wholeheartedly welcome Supreme Court verdict on Sree Padmanabhaswamy Temple. It re-establishes our family's connection with Lord Sree Padmanabha. The family is happy about it. We're looking forward to reading the full verdict:Adithya Varma,Travancore royal family member to ANI https://t.co/suciUDeVvD
— ANI (@ANI) July 13, 2020
पद्मनाभस्वामी मंदिर ५००० वर्ष जुने मंदिर आहे आणि ते केव्हा बांधले गेले याचा कोणताही पुरावा नाही. इतिहासकार डॉ. एलके रवी वर्मा यांच्या मते, मानवी संस्कृती कलियुगात आली, तेव्हा हे मंदिर ५००० वर्षांपूर्वी बांधण्यात आले असावे असे म्हटले गेले. मंदिराच्या रचनेच्या दृष्टीने असे मानले जाते की, केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये श्री पद्मनाभस्वामी मंदिर १६व्या शतकात त्रावणकोरच्या राजांनी बांधले होते. तेव्हापासून या ठिकाणच्या राजांकडे मंदिराची जबाबदारी होती. सन १७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत: ला पद्मनाभ दास घोषित केले आणि संपूर्ण राजघर मंदिराच्या सेवेत मग्न झाले. आताही राजघराण्याखालील खासगी ट्रस्ट मंदिराची देखभाल करत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.