नवी दिल्ली | “पाकिस्तान पंतप्रधान मोदींना सहकार्य करत आहेत. म्हणूनच आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे, असे इम्रान खान म्हणतात”, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होऊ शकते, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे आरोप केले आहेत.
Pak has officially allied with Modi!
‘A vote for Modi is a vote for Pakistan’, says Pak PM Imran Khan
मोदीजी, पहले नवाज़ शरीफ़ से प्यार और अब ईमरान खान आपका चहेता यार!
ढोल की पोल खुल गयी है।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 10, 2019
इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे देशातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. “आगामी निवडणुकांसाठी पाकिस्तान पंतप्रधान मोदींना सहकार्य करत आहे. यात पंतप्रधान मोदींना मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे, असे इम्रान खान म्हणतात. यापूर्वी नवाज शरीफ यांचे मोदींवर प्रेम होते आणि आता इम्रान खान हे मोदींचे प्रिय मित्र आहेत. पंतप्रधान मोदींची पोलखोल झाली आहे”, असा टोलाही काँग्रेसने यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.