HW News Marathi
देश / विदेश

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी

जनदाली – पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचा पाकिस्तानला विरोध वाढत असून स्वातंत्र्याची इच्छा प्रबल होत आहे. पाकपासून स्वातंत्र्याच्या मागणीसाठी येथे नुकताच एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जम्मू-काश्मीर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनने पीओकेच्या जनदाली भागात हा मोर्चा काढला होता.

पाकिस्तानकडून या भागात करण्यात येणाऱ्या अन्याय, अत्याचार, अमानवीय वागणुकीचा या वेळीनिषेध करण्यात आला. पाकिस्तानकडून इथे दहशतवादी पाठवण्यात येत असल्याचा आरोपही स्थानिक नेते लियाकत खान यांनी रॅलीदरम्यान केला. यापूर्वी मे महिन्यातही पीओकेमधील हजीरा येथील डीग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अशीच रॅली काढून पाकिस्तानचा निषेध केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit

पुन्हा रेल्वे अपघातात, 74 गंभीर जखमी 

News Desk

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव सांगा, मग चर्चा – काँग्रेस

News Desk