नवी दिल्ली | “भारताने शांततेची बोलणी केली तर आम्ही देखील करू. मात्र जर भारताने युद्धाची भाषा केली, तर आम्ही देखील आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना कधी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येईल आणि ना कधी मंदिरात घंटानाद होईल”, अशी धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दिली आहे. “पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. पाकिस्तान म्हणजे आमचे जीवन आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. कोणीही पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याचे डोळे काढू”, अशी धमकी देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
Video Message of Federal Minister for Railways @ShkhRasheed commenting on PM @ImranKhanPTI 's address to the nation in wake of arising situation after #PulwamaAttack
He said Pakistani nation is ready to stand with its leader #ImranKhan in peace and wartime pic.twitter.com/V530xtcJen— Radio Pakistan (@RadioPakistan) February 19, 2019
“पाकिस्तान मुस्लिमांचा किल्ला असून आज जगभरातील मुस्लिमांचे लक्ष पाकिस्तानकडेच आहे. पाकिस्तान म्हणजे आमचे जीवन आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. कोणीही पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याचे डोळे काढू”, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. युद्ध होवो वा शांतता पाकिस्तानची २० कोटी जनता पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
“भारतातील माध्यमे, राजकारणी लोक पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. मात्र, कोणत्याही पुराव्यांअभावी, न्यायव्यवस्थेच्या वर जाऊन तुम्ही आमच्यावर हे आरोप कसे काय करू शकता ?”, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले. “भारताने जर आमच्यावर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही विचारही करणार नाही. आम्ही थेट प्रत्युत्तरच देऊ”, असेही इम्रान खान यांनी यावेळी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील १४ फेब्रुवारीला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आज (१९ फेब्रुवारी) आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.