HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : पाकिस्तानी वृत्तपत्राने दहशतवाद्यांना म्हटले ‘स्वातंत्र्यसैनिक’

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. असे असताना पाकिस्तानकडून मात्र भारताला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘द नेशन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने या दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून संबोधले आहे. तसेच ‘भारतव्याप्त काश्मीर’मध्ये हे कृत्य झाल्याचे देखील या वृत्तपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

पुलवामा येथे झालेला हा हल्ला जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत हृदयद्रावक आहे. पाकिस्तानला धडा शिकवा, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करा, अशा मागण्या देशभरातून होत आहेत. देशातील नागरिकांच्या मनात प्रचंड संताप खदखदत आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही पाकिस्तानकडून कुरापती थांबण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानी वृत्तपत्राचे दहशतवाद्यांसाठी ‘स्वातंत्र्यसैनिक’ हा शब्द प्रयोग जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळ माझ्यासाठी वाराणसी ऐवढेच महत्त्वाचे | पंतप्रधान मोदी

News Desk

“सीबीआय, ईडीच्या तलवारी उपसून भय निर्माण करणारे केंद्र अशा वेळी पळपुटेपणा दाखवते”

News Desk

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk