HW Marathi
देश / विदेश

अखेर पाकिस्तानची कारवाई, मसूद अजहरच्या २ भावांसह ४४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली | पाकिस्तान सरकारने अखेर मंगळवारी (५ मार्च) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या २ भावांसह एकूण ४४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदने भारतीय जवानांवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलावीत अशी मागणी जगभरातील देशांकडून केली जाऊ लागली. याचमुळे पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा घट

News Desk

ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी वाहन चालकाला जन्मठेप

News Desk

कोपर्डी प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

News Desk