HW News Marathi
देश / विदेश

सौदीच्या राजपुत्राला पाकने दिली ‘गोल्डन प्लेटेड सबमशीन गन’

नवी दिल्ली | सौदी अरबचे काऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे रविवारी (१७ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. सौदीच्या या राजपुत्राचे पाकिस्तानने मोठ्या जल्लोषात स्वागतासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. या दौऱ्यात पाकिस्तानाने सौदी राजपुत्राला भेट म्हणून एक गोल्डन प्लेटेड सबमशीन गन दिली आहे.

एखाद्या देशातील राष्ट्राध्यक्षाला एका देशाकडून अशाप्रकारेचे गन गिफ्ट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. जेव्हाही एका देशाचा राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या देशात दौऱ्यावर जातो तेव्हा तो देश पाहुण्यांना काहीतरी गिफ्ट देतात. पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर सौदी राजपुत्र दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते.

पाकिस्ताने दिलेली ही हेकलर अ‍ॅन्ड कोड एमपी५ एक सबमशीन गन आहे. ही गम एका जर्मन इंजिनिअरने तयार केली आहे. ही गन सोन्याच्या डिझाइनने मॉडिफाय करण्यात आली आहे. पाकमध्ये प्रिन्सला या गनसोबतच आणखी एक पोट्रेटही गिफ्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या भेटी दरम्यान पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यात २० बिलियन डॉलरच्या गुंतवणूकीचा करार करण्यात आला आहे. तर यावेळी सलमान यांनी सौदीच्या तुरूंग असलेल्या २ हजार पाक कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे, राजीव सातव यांचे सोनिया गांधींना पत्र

News Desk

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान! – राष्ट्रपती

Aprna

Republic Day | प्रजासत्ताक दिनाची ही छायाचित्रे नक्की पहा

News Desk