HW News Marathi
Covid-19

८२ वर्षाच्या पार्ले -जी बिस्किटाने लॉकडाऊनच्या काळात केली विक्रमी नोंद

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. आर्थिक चणचण भासू लागली. अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे आपली भूक आणि आपले मन तृप्त करणारे लोकप्रिय पार्ले-जी बिस्किटाने विक्रमी नोंद झाली आहे. पार्लेने गेल्या ८२ वर्षांचा विक्री करण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.

१९३८ पासून घराघरात पोहोचलेल्या पार्ले जी बिस्किटाने लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे. गेल्या आठ दशकातील आकडेवारी पाहता मार्च, एप्रिल आणि मे हे सर्वोत्तम महिने राहिले असल्याची माहिती मिळत आहे.एकूण मार्केट शेअरमध्ये ५ ट्क्के वृद्धी झाली आहे. पण त्यातही ८० ते ९० टक्के वृद्धी ही केवळ पार्ले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे. हे अनपेक्षित आहे,” असे पारले प्रोडक्ट्सचे मयांक शाह यांनी सांगितले.

२४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी बिस्किटांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना काम सुरु कऱण्याची परवानगी देण्यात आली होती. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही केली होती. एकदा काम सुरु झाल्यावर त्यांचं सर्व लक्ष जास्तीत जास्त विक्री कशी होईल याकडे लागलं होतं.

गेल्या तीन महिन्यात फक्त पार्ले- जी नाही तर इतर बिस्किटांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ पाहायल मिळाली. ब्रिटानियाच्या गुड डे, टायगर, मिल्क बिकी, बॉरबॉर्न आणि मारी तर पारलेच्या क्रॅकजॅक, मोनॅको आणि हाईड अँण्ड सिक यांच्याही विक्रीतही कमालीची नोंद झाली आहे. लॉकडाउनदरम्यान, पार्ले-जीने अनेकांसाठी जेवणाची जागा घेतली. अनेकांची भूक भागवली. जे लोक जेवण विकत घेऊ शकत नव्हते, ते पार्ले-जी बिस्किट विकत घेऊ शकत होते, अशी माहिती मयांक शाह यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार…

News Desk

आज एका दिवसात ९७ रुग्णांचा बळी, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ७५८ वर

News Desk

मरकजवाल्यांना गोळ्या घालुन ठार मारलं पाहिजे,राज ठाकरे कडाडले !

News Desk