नवी दिल्ली | देशात सध्या कोरोनाच्या संकटामूळे लॉकडाऊन सुरू आहे. अनेक श्रमिक, मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत त्यांना घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. यातच नागरिकांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. भारतीय रेल्वेने आता आपल्या पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, १२ मेपासून पॅसेंजर ट्रेन्स हळुहळू सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी बुकिंग आजपासून (११मे) संधयाकाळी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तिकिट बुकींगसाठी नागरिकांनी IRCTCच्या वेबसाईटवर लॉगइन करायचे आहे.
सुरुवातीला ३० ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही रेल्वेने म्हटले आहे. यासोबतच रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल आणि त्यानंतरच त्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जर प्रवाशांमध्ये संक्रमणाचे लक्षण जाणवले नाही तरच त्यांना प्रवास करता येणार आहे.
या १५ ट्रेन्स दिल्लीतून सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन्स दिल्लीतून पाटणा, मुंबई, अहमदाबाद, रांची, बिलासपूर, भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, सिकंदराबाद, बंगळुरू, मडगांव या स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच, प्लॅटफॉर्म तिकिटासाठीही काऊंटर सुरु करण्यात येणार नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी तिकिटासाठी रेल्वे स्थानकांकडे धाव घेण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Indian Railways plans to gradually restart passenger train operations from 12th May, 2020, initially with 15 pairs of trains
These trains will be run as special trains from New Delhi Station connecting 15 important cities of the countryhttps://t.co/tOvEFT1C8Z pic.twitter.com/dvdxKaxshM
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.