नवी दिल्ली | केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या एक्साईज ड्यूटी १.५० रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला असून पेट्रोल उत्पादन कंपन्यांनी १ रुपया असे मिळून २.५० रुपयांनी पेट्रोल-डिझेलची किंमत कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
Excise duty to be reduced by Rs.1.50 & OMCs will absorb 1 rupee. So, a total of Rs.2.50 will be reduced on both diesel and petrol: Finance Minister Arun Jaitley pic.twitter.com/sV4eZwmKEw
— ANI (@ANI) October 4, 2018
We are writing to the state govts that as the central govt is cutting Rs 2.50 on both petrol & diesel, they do the same: FM Arun Jaitley pic.twitter.com/7QQ6TFrsnJ
— ANI (@ANI) October 4, 2018
राज्य सरकारांच्या व्हॅटमुळे उत्पन्न वाढ होत आहे. तेलाची किंमत वाढली की व्हॅटनुसार त्यांचे उत्पन्नही वाढते. यामुळे राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ५ रुपयांनी कपात करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जेटली यांनी यावेळी दिले.
#WATCH Finance Minister Arun Jaitley briefs the media in Delhi https://t.co/AYU7yA9njp
— ANI (@ANI) October 4, 2018
महाराष्ट्र सरकारने राज्यात पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅट २.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून महाराष्ट्रातील जनतेला दिली आहे.
Maharashtra Government also decided to give additional relief of ₹2.5/litre on Petrol to give total benefit of ₹5/litre in the State of Maharashtra.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2018
पेट्रोल-डिझेलच्या किंमती सतत वाढ होत असल्यामुळे सर्व सामान्यांमध्ये सरकार विरोधात असंतोषचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच काही राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून विरोधकांनी भाजप सरकारची कोंडी करून नये म्हणून किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.