HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, पेट्रोल १२ पैशांनी महागले

नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत मंगळवारी (२ ऑक्टोबर)ला पेट्रोल १२ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १७ पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर ९१.२० रुरपये तर डिझेल प्रति लिटर ७९.८९ झाला आहे. सतत होणाऱ्या इंधन दरवाढीने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे.

दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८३.८५ रुपये तर डिझेल प्रति लिटर ७५.२५ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल १२ पैसे तर डिझेल १६ पैशांनी महाग झाले आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात देखील वाढ केली असून प्रति किलो १.७० रुपयांनी वाढले आहे. तर नोएडामध्ये १.९५ रुपयांनी दर वाढविला आहे. तसेच विना अनुदानित गॅस सिलेंडरचा दर जवळपास ५९ रुपयांनी महागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है”, राऊतांचा अमित शाहांना टोला

News Desk

संख्याबळाची चिंता नको, विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा !

News Desk

शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंनी ३५,००० कोटींकडे वेधलं केंद्राचं लक्ष

News Desk