HW News Marathi
देश / विदेश

‘नासा’ने काढले इस्रोच्या ‘विक्रम लँडर’चे छायाचित्र

वॉशिंग्टन | अमेरिकन अंतराळ संस्था नासाने भारताच्या चांद्रायान – २ मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. नासाने ‘लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर कँमरा’द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काढलेले छायाचित्रे आहे. ही छायाचित्र नासाने आज (२७ सप्टेंबर) सकाळी जाहीर करण्यात आली आहे. नासाने हे छायाचित्रे १५० किमी अंतरावरून काढण्यात आली आहेत.

विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विक्रमचे हे उतरताना अपेक्षेनुसार झाले नाही. यानंतर ७ सप्टेंबरला विक्रमचा संबंध तुटल्याचे इस्रोने सांगितले. मात्र, विक्रम लँडर नेमका कोणत्या जागी आदळला हे अद्याप समजू शकला नाही. परंतु एलआरओ यान चांद्रयान किंवा विक्रम लॅण्डरचे सध्याचे स्थान शोधू शकले नाही.

“अंतराळात शोधकार्य कठीण गोष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -२ उतरवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो, तुम्ही केलेल्या या कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, भविष्यातील अंतराळ मोहिमांचं नियोजन आपण एकत्रित करु अशी आशा आहे” असे ‘नासा’ने ट्वीट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

IMA चे माजी अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी! –  नाना पटोले

Aprna

Independence Day 2022 : जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk