मुंबई | देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडत होत आले आहे. तर दुसऱ्या बाजुला भारताच्या लडाख सीमेवर चीनच्या खुरापती सुरू आहे. यामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव वाढल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला. यावर ट्रम्प म्हणाले, चीनसोबत सध्या सुरु असलेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाही आहेत, असे म्हणाले.
#WATCH "We have a big conflict going on between India & China, 2 countries with 1.4 billion people & very powerful militaries. India is not happy & probably China is not happy, I did speak to PM Modi, he is not in a good mood about what's going on with China": US President Trump pic.twitter.com/1Juu3J2IQK
— ANI (@ANI) May 28, 2020
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “भारत आणि चीन यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशात १.४ बिलियन लोकसंख्या असून ज्यांच्याकडे लष्कराची ताकद मजबूत आहे. भारत आनंदी नाही आणि कदाचित चीनही खूश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मात्र, चीनसोबत सध्या सुरु असलेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाही आहेत.” व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये काल (२८ मे) डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारत आणि चीनमधील हा एक मोठा संघर्ष सुरु आहे. यावर बोलताना ते म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.