बिश्केक | शांघाय शिखर संमेलनाचा (एससीओ) गुरुवारी (१३ जून) सुरू झाले आहे. “दहशतवाद वाढविणाऱ्या देशांविरोधात एससीओ सदस्य देशांनी एकत्र यावे, असे आवाहन,” या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१४ जून) संबोधित करताना म्हणाले आहेत. मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून नाव न घेता पाकिस्तानावर निशाणा साधला.
PM Narendra Modi addressing leaders of member states at the SCO summit in Bishkek, Kyrgyzstan: To tackle the danger of terrorism, all humanitarian powers should come forward together. Countries that provide encouragement, support, & finances to terrorism must be held accountable. pic.twitter.com/1h1vb9tgIU
— ANI (@ANI) June 14, 2019
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर मी जेव्हा श्रीलंकेत गेलो. तेव्हा मी सेंट अँथनीच्या चर्चला भेट दिली. मी जेव्हा तेथे गेलो तेव्हा त्या ठिकांणी दहशतवादी कुरुप चेहरा पाहिला मिळाला. जो निष्पाप लोकांचे जीवन घेतो. तसचे दहशतवादासाठीचे फंडिंग रोखण्यापासून दहशतवाद संपविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. समाज दहशतवादी मुक्त झाला पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.
PM Modi in Bishkek: Literature & culture provide our societies a positive activity, stop the spread of radicalization among the youths. During my visit to Sri Lanka I visited the St. Anthony's shrine, where I witnessed the ugly face of terrorism that takes the lives of innocents. pic.twitter.com/JeSoVtb3Vg
— ANI (@ANI) June 14, 2019
ज्यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले त्यावेळी तेथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान उपस्थित होते. मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग यांच्यात चर्चा झाली. पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवादाच्या मुद्यावरही या दोघांमध्ये चर्चा करण्यात आली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत भारताने पाकिस्तानला दहशतवादावर ठोस निर्णय घेण्यावर जोर दिला.
एससीओ शिखर संमेलन काय आहे?
एससीओ म्हणजेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात सहकार संघटन संमेलन. एससीओ ही राजकीय आणि सुरक्षा संघटना आहे. या संघटनेचे मुख्यालय चीनच्या बीजिंगमध्ये आहे. २००१ मध्ये ही संघटना निर्माण झाली. चीन, रशिया, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान हे संघटनेचे सदस्य आहेत. भारत आणि पाकिस्तान २०१७ पासून संघटनेचे सदस्य झाले आहेत. सदस्य देशांचे सैन्य, आर्थिक मदत, गुप्त माहितीची देवाणघेवाण, मध्य आशियातील दहशतवादाविरोधात मोहीम अशा मुद्द्यांवर चर्चा होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.