माले | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींना मालदीवच्या ‘निशान इज्जुद्दीन’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांनी नरेंद्र मोदींना हा सन्मान बहाल केला. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य या धोरणानुसार मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे. तसचे नरेंद्र मोदींचा हा दुसरा मालदीव दौरा आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी मागील वर्षी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधीसाठी मालदीवला गेले होते.
#WATCH President of Maldives, Ibrahim Mohamed Solih confers upon PM Narendra Modi, Maldives' highest honour accorded to foreign dignitaries, 'The Most Honourable Order of the Distinguished Rule of Nishan Izzuddeen'. pic.twitter.com/dzl79XZXzN
— ANI (@ANI) June 8, 2019
‘भारत कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक संकटात मालदीव मदत करणार असून दोन्ही देशांच्या नागरिकांना विकास आणि स्थिरता हवी आहे. मालदीवमध्ये विकासाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. आपल्या द्विपक्षी सहकार्यामुळे भावी दिशा ठरेल. दोन्ही देशाच्या लोकांचा संपर्क वाढविण्यासाठी आम्ही दोन्ही देशांदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासंबंधी परस्पर सहमती जाहीर केली आहे,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले.
PM Narendra Modi in Male, Maldives: India gives utmost importance to its relationship with Maldives. We want to have a strong partnership with each other. India is willing to help Maldives in every way possible. May the friendship between India & Maldives last forever. pic.twitter.com/lETqihJG2G
— ANI (@ANI) June 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.