HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदी दौऱ्यासाठी अचानक पोहोचले लेह-लडाखमध्ये

श्रीनगर | भारत चीनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सध्या देशात अस्थिरता आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत. चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते गलवान येथे जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत हे देखील आहेत.

भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर देशातील राजकारणही चांगलेच तापले आहे. विरोधीपक्षांनी सरकारकडून लडाखमधील संघर्षासंदर्भात माहिती लपवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत भारताची एक इंच जमीनही कोणाला देण्यात आलेली नाही असं सांगत आहे. मागील दोन आठवड्यांपासून या प्रश्नावरुन देशातील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये आणि भाजपामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला जेव्हा कोणी विचारतही नव्हतं तेव्हा आमच्या कुटुंबाने ….! । प्रीतम मुंडे

News Desk

लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक सादर

News Desk

MarathaReservation : २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार

News Desk