HW Marathi
देश / विदेश राजकारण

गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल !

नवी दिल्ली। नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. राज्यसभेत या विधेयकाला १२५ खासदारांनी यांच्या बाजूने तर १०५ खासदारांनी विरोधात मतदान केले.या विधेयक लोकसभेत सोमवारी (९डिसेंबर) ३११ मते तर विरोधात ८० मतांनी संमत झाले हे विधेयक मंजूर झाल्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. “देशाच्या इतिहासात आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्यांना लोकांना आता न्याय मिळेल आहे, ” असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले.

राज्यसभेत हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (११डिसेंबर) मांडले. हे विधेयक राज्यसभेत मांडल्यापासून त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. यावेळी विरोधकांनी शहरांना अनेक प्रश्न विचारली. शहांनी विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी मुस्लीमांचा समावेश यामध्ये का केला नाही? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांमध्ये मुस्लीम नागरिक अल्पसंख्यांक नाहीत. त्यामुळे मुस्लीम समाजावर या देशांमध्ये कोणताही अत्याचार होत नाही. या देशांमधील हिंदू, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन अशा समाजातील नागरिकांवर अन्याय होत आहे. या देशांमध्ये या समाजातील नागरिकांवर एवढे अन्याय होतात की त्यांना त्यांचा देश सोडून भारतात शरण यावे लागत आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील आनंद व्यक्त केला. कोट्यवधी वंचित आणि पीडितांचे स्वप्ने आज प्रत्यक्षात आले आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर व्हावे यासाठी शहांनी विशेष प्रयत्न केले. विरोधकांनी उपस्थित केलेले सर्व दावे खोडून काढत त्यांनी सरकारची बाजू समर्थपणे मांडली.

Related posts

उद्धव ठाकरेंसबोत कोण कोण घेणार शपथ

News Desk

काँग्रेसने आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत !

News Desk

देशभरात ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk