HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकमधील मंदिरात प्रसादातून विषबाधा, १३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवादी गावात गुरुवारी (१४ डिसेंबर) मरम्मा मंदिराच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून १३ जणांना विषबाधा झाली आहे. तर ११ जणांची प्रकृती गंभीर असून जवळपास ९० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनाच्या दोन २ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी रुग्णालयात जाऊन या विषबाधा पीडितांची भेट घेऊन त्यांच्यावरील उपचारांबाबत देखील आदेश दिले आहेत.

या प्रसादाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रसादामुळे लोकांना उलट्या आणि पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या संपूर्ण प्रकारची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठीची शिक्षणाची मर्यादा शिथिल

News Desk

काश्मीरच्या त्रालमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

नन बलात्कार प्रकरणातील आरोपीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

swarit
व्हिडीओ

आरबीआयच्या गव्हर्नरपदी मोदी सरकारने आपला माणूस चिकटवला

News Desk

सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे.भारतीय जनता पक्षाचेच खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर

Related posts

Pooja Chavan आत्महत्या प्रकरणानंतर Sanjay Rathod आता नव्या वादात…

News Desk

NCP – Manse Alliance | फक्त लढ म्हणा…

Arati More

Gandhi यांनी देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूस बोलू शकतो! – Jitendra Awhad

News Desk