बंगळुरू | कर्नाटकातील जनता दल सेक्युलर (जेडीएस) आणि काँग्रेस आघाडीचे सरकार मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी पक्षाच्या ११ आमदार राजीनामा देण्यासाठी विधानसभेत पोहोचले आहेत. या आघाडीचे काँग्रेस ८ आणि जेडीएसचे ३ आमदारांनी विधानसभाध्यक्ष के. एन. रमेश कुमार यांच्याकडे गेले होते. आमदार राजीनामा सोपवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेले होते. मात्र अध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांनी त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला.
Congress-JDS MLAs B C Patil,H Vishvanath, Narayan Gowda,Shivaram Hebbar,Mahesh Kumathalli,Gopalaiah,Ramesh Jarkiholi and Pratap Gowda Patil submitted their resignations to Secretary at Speaker office #Karnataka https://t.co/wPk7Iaznk8
— ANI (@ANI) July 6, 2019
कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांची सायंकाळी ५ वाजता आपातकालीन बैठक बोलावली आहे. गतवर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते.
#UPDATE Karnataka: Deputy Chief Minister G. Parameshwara and State minister D. K. Shivakumar have called a emergency meeting of Congress Bengaluru MLAs and Corporators later today after 8 Congress& 3 JDS MLAs reached Assembly speaker office. https://t.co/a62qceokan
— ANI (@ANI) July 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.