HW News Marathi
देश / विदेश

उत्तरप्रदेशपाठोपाठ छत्तीसगडमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडीत होऊन बालके दगावली

रायपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रेदशमधील गोरखपूरमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी 104 बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असताना छत्तीसगडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी छत्तीसगडच्या डॉ. भीमराव आंबेडकर तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणारा कर्मचारी मद्यपान करत असल्याचे ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नसल्याचे समोर आले आहे.. परिणामी तिन्ही मुलं दगावली,असा दावा माध्यमांनी केला आहे. याप्रकरणाची रमण सिंह यांनी गंभीर दखल घेतली असून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये आरोग्याचे प्रश्न चव्हाट्यावर येत असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार – निलेश राणे

News Desk

आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही !

News Desk

एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया ! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

News Desk