HW News Marathi
देश / विदेश

फटाके फोडणे आणि मारणे ही भारतीय संस्कृती नाही – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली | माणूस किती निर्दयी असू शकतो हे केरळमध्ये घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले. केरळमधील मलप्पुरम येथे काही जणांनी भुकेल्या हत्तीने ला अननसाच्या आत फटाके ठेवत ते खायला दिले आणि त्याचा स्फोट होऊन गर्भवती असलेल्या या हत्तीणीचा मृत्यू झाला. गर्भवती हत्तीणीचा मृत्यूनंतर देशभरातून घडलेल्या या घटनेचा संताप आणि विरोध व्यक्त करण्यात आला तसेच केंद्राने देखील दखल घेतली आहे.
केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची कसून तपासणी करून दोषींवर कारवाई करू असे देखील प्रकाश जावडेकर यांनी म्हटले.
काय घडले?
अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय आहे #MeToo कशी सुरुवात झाली, तुम्हाला माहित आहे का ?

Gauri Tilekar

होळीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी धरला ठेका …

News Desk

आता तुम्ही ड्रोन उडवू शकता… पण या आहेत अटी

News Desk