HW News Marathi
देश / विदेश

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री, नावावर शिक्कामोर्तब

मुंबई | गोव्याच्या मुख्यमंत्री पदी दुसऱ्यांदा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला आहे. प्रमोद सावंत हे सलग दुसऱ्यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित करण्यासाठी गोवा भाजपची आज (२१ मार्च) बैठक पार पडली. या बैठकीत प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपचे विश्वजित राणे यांचे नाव देखील चर्चेत आले होते. परंतु, अखेर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कमोर्तब केला आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्री निवड करण्यासाठी भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. गोव्यात १० मार्चला भाजपचा विजय झाला होता. यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, मुख्यमंत्री होण्यासाठी प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जावून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच भेट घेतली होती. यानंतर राणे आणि सावंत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आज अखेर गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित झाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit

‘खाल्लेही, मित्रांना खाऊ घातलेही. फक्त जनतेला खाऊ देत नाहीत ‘, राहुल गांधींची सरकारवर टीका

News Desk

अवघ्या चौदा मिनिटांत अमेरिका नष्ट करणार, उत्तर कोरियाची धमकी

News Desk