HW News Marathi
देश / विदेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे काल (३१ ऑगस्ट) वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज (१ सप्टेंबर) लोधी स्मशान घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना १० ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते व्हेंटीलेटरवर होते. प्रणव दा यांना कोरोना संसर्गदेखील झाला होता. यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी आणि कुटुंबातील सदस्यदेखील पीपीई किट घालून उपस्थित होते.

प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk

उमर खालिदला अटक, दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा ठपका

News Desk

मध्यप्रदेशात एस्मा कायदा लागू, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिली माहिती

News Desk