HW News Marathi
देश / विदेश

मशिदीत नमाज अदा करणे इस्लामचा अविभाज्य भाग?

नवी दिल्ली | इस्लाममध्ये नमाज अदा करणे हा अविभाज्य घटक असे मानले जाते. परंतु मशिदीत नमाज अदा करणे हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे का ? याबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 जुलै रोजी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचे का, याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय आज देण्याची शक्यता आहे.

आधार कार्ड आणि एससी-एसटी समुदायाच्या पदोन्नतील आरक्षणावर महत्त्वपूर्ण निकाल देणारे सर्वोच्च न्यायालय आज हा एक महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे. हे प्रकरण अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीशी देखील निगडीत आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही, याबद्दल आज सर्वोच्च निकाल येणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाउन हे पॉज बटनासारखे आहे, कोरोना थांबल्यासारेख वाटेल पण जाणार नाही !

News Desk

1 मे नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या लाल दिवा काढणार

News Desk

मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस, खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत

News Desk