HW News Marathi
देश / विदेश

हिमाचलमध्ये प्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार 

अमित शहा यांनी केली घोषणा

शिमला – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून भाजपने प्रेम कुमार धूमल यांचे नाव जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची आज घोषणा केली. ७३ वर्षीय धूमल हे दोन वेळा हिमाचलचे मुख्यमंत्री राहीले आहेत. काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार या पूर्वीच जाहीर केले आहे. राज्यातील 68 जागांसाठी 9 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. तर निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. प्रेमकुमार धूमल हे 2 वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. प्रेम कुमार धूमल यावेळी सुजानपूर विधानसभा मतदारसंघातून निवणूक लढवत आहेत. त्यांनी 2012 मध्ये हमीरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यावेळी ही पक्षाने त्यांना विधानसभा मतदारसंघ बदलला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर आहेत. यापूर्वी ते बमसन मधूनही निवडणूक लढले होते. सध्याच्या हिमाचल विधानसभेचे ते विरोधपक्षनेतेही आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या समुद्रात बुडून दाखवाच!

News Desk

सवर्ण आरक्षण विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात; युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

Aprna