HW News Marathi
देश / विदेश

अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू !

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटामुळे रखडलेले राम मंदिराचे काम आता सुरू होणार आहे. ५ ऑगस्टला भूमीपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाच्या हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. भूमिपूजनासाठी भव्य तयारी केली जात आहे. सर्व नियम लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गजांना आमंत्रण दिले जाऊ शकते.

राम मंदिर चळवळीशी संबंधित अनेकांना या पूजनासाठी बोलावले जाऊ शकते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांना देखील बोलावण्यात येणार आहे. तसेच उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना बोलवले जाऊ शकते. आलोक कुमार, मिलिंद परांडे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सहभागी होऊ शकतात. मोहन भागवत आणि अन्य काही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहभागी होऊ शकतात.

सरकारमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. व्हीआयपी मान्यवरांची संख्या केवळ ५० इतकीच असणार आहे. याशिवाय अयोध्येच्या काही भागांमध्ये एक मोठी स्क्रीन बसवली जाणार आहे. ज्यामुळे लोकांना या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास श्रीराम लला यांना मणिरामदास छावणीच्या वतीने ४० किलो चांदीची सिला अर्पण करणार आहेत. ही चांदीची शिळा पूजेच्या वेळी मंदिराच्या पायाभरणी दरम्यान वापरली जाणार आहे. राम मंदिराच्या बांधकामाचा वेग आता वाढू लागला आहे. भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, येत्या ४-५ वर्षात मंदिराचे काम पूर्ण होऊ शकते. तसेच, जुन्या नकाशात काही बदल करत सुंदर असे रामाचे मंदिर उभारण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तीकांता दास

News Desk

फेसबुकची अमेझॉनशी थेट स्पर्धा

News Desk

शहीद भगतसिंगांचं ते पिस्तुल 90 वर्षांनंतर जगासमोर

News Desk