HW Marathi
देश / विदेश राजकारण

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आता कायद्यात रुपांतर

नवी दिल्ली । नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात हे विधेयक संमत झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येते. राष्ट्रपतींने काल (१२डिसेंबर) या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने यांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

या विधेयकानुसार अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे ३१ डिसेंबर, २०१४ आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी या विधेकाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणा-यांना न्याय मिळाल्याचे मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने १२५मते पडली, तर विधेयकाविरोधात १०५ सदस्यांनी मतदान केले. शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत सभात्याग केला. तर लोकसभेत ३११ यांच्याविरोधात ८० मते पडली होती. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Related posts

मोदींनी दिला जय अनुसंधानचा नारा

News Desk

तृणमूल काँग्रेसने फेटाळला ममता बॅनर्जींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk

राष्ट्रवादीकडून विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

News Desk