नवी दिल्ली | हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना तेलंगणा पोलिसांनी आज (६ डिसेंबर) त्यांचे एन्काऊंटर केले. तेलंगणा पोलिसांचे देशभरात कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रपती म्हणाले की, “पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी असलेल्या आरोपींना दयेचा अर्ज करता येऊ नये. कायद्यात तशी तरतूद करायला हवी, ” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती राज्यस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
#WATCH "Women safety is a serious issue. Rape convicts under POCSO Act should not have right to file mercy petition. Parliament should review mercy petitions,"President Ram Nath Kovind at an event in Sirohi, Rajasthan pic.twitter.com/0noGCUaNhQ
— ANI (@ANI) December 6, 2019
तसेच २०१२ मधील निर्भया हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरविले होते. या निर्भया प्रकरणातील आरोपी चारपैकी एका आरोपीने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला आहे. तो अर्ज राष्ट्रपतींनी रद्द करावा, अशी मागणी गृहमंत्रालयाने केली आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारने देखील निर्भया हत्याकांडातील आरोपीने केलेल्या दयेची याचिका रद्द करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. निर्भया हत्याकांडातील चारही जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर या चारपैकी एका आरोपींनी ४ नोव्हेंबरला राष्ट्रपतींकडे दयेची याचिका पाठविली आहे. आता राष्ट्रपती या दया याचिकेवर कारय निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ministry of Home Affairs sends file of mercy plea of 2012 gang rape convict Vinay Sharma to President Ram Nath Kovind, recommends rejection of mercy plea. pic.twitter.com/x3s4jzT0Xa
— ANI (@ANI) December 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.