HW News Marathi
देश / विदेश

#KashmirIssue : … तर मोदींनी ट्रम्पसोबतच्या बैठकीत काय घडले ते सांगावे !

नवी दिल्ली | काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मदत मागितल्याचा दावा भलेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या विधानाने देशाचे राजकाणारण चांगलेच तापले आहे. यानंतर संसदेत देखील या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला असून काही काळासाठी संसद तहकूब देखील झाले आहे. ” राष्ट्राध्यक्ष ट्रम्पबरोबर आहेत, तर मोदींनी ट्रम्प यांच्यातील बैठकीत काय घडले ते सांगवे”, असे म्हणत खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बरोबर आहेत, तर काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी विचाले आहे. जर हे सत्य असेल तर मोदींनी भारताच्या हितसंबंधांना आणि १९७२ शिमला करारनामा दिला आहे. परंतु मोदींच्या कमकुवत परराष्ट्र मंत्रालायने नकार दिला आहे. मोदींनी ट्रम्प यांच्यातील बैठकीत काय घडले ते सांगतले पाहिजे, ” असे ट्वीट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

“ मोदींनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केलीच नव्हती. तसेच काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असून यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.” पुढे असे देखील म्हणाले की, “पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्दयावर चर्चा होऊ शकते. मात्र, त्यांच्याकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. शिमला आणि लाहोर समझौता ज्याप्रकारे झाला. त्याचप्रकारे पाकिस्तानसोबत प्रत्येक मुद्दा द्विपक्षीय चर्चेने सोडविला जाऊ शकतो, ” असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी

News Desk

अभिनेत्री रिया चक्रवर्ती अडचणीत ! NCB कडून एफआयआर दाखल

News Desk

नुकसानीचे खोटे पंचनामे सहन करणार नाही, अन्यथा रस्त्यावर उतरू !

News Desk