HW News Marathi
देश / विदेश

इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू

वॉशिंग्टन | जगाता कोरोनाने हाहाकार घातला आहे. पण सगळ्यात जास्त हानी ही अमेरिकेची झाली आहे. जगातील या महासत्तेला एका न दिसणाऱ्या विषाणूने सळो की पळो करुन सोडले आहे. चीनच्या वुहान नंतर कोरोनाचे महत्त्व केंद्रंच जणू अमेरिका बनले आहे. दरम्यान, पहिल्यांदाच इतिहासात अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशातील ५० राज्यांमध्ये पूर्णपणे आपत्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्विटही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केत्त्व केंद्रंच जले आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1249418405951799309?s=20

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ही ५ लाखांहून अधिक एसून मृत पावलेल्यांची संख्या ही २१ हजारांहून अधिक आहे. अमेरिका एका न पाहिलेल्या शत्रुशी युद्ध करत आहे असे ही ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. दरम्यान, जगभरात बाधितांचा आकडा हा १८ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाखाच्या पुढे आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे इटलीत काही अंशी मृतांच्या आकड्यात घट होताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

News Desk

कमलनाथ सरकार पुन्हा अडचणीत, विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले ‘त्या’ आमदारांचे राजीनामे

News Desk

#Oscars2022 : पत्नीवर केलेल्या ‘जोक’वर स्मिथने थेट सूत्रसंचालकाच्या कानशीलात लगावली, पुरस्कार मिळाल्यानंतर माफीनामा

Aprna