नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्राच्या शिफारशीला बुधवारी (१९ डिसेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सहा महिन्यांची राज्यपाल राजवट १९ डिसेंबरला संपल्यानंतर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अहवालानंतर केंद्राकडून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती.
President's rule has been imposed in Jammu And Kashmir after the expiry of six-months of Governor's rule. pic.twitter.com/TpNKIMtuI7
— ANI (@ANI) December 19, 2018
भाजपने जम्मू-काश्मीरमधील पीडीपीला दिलेला आपला पाठिंबा काढून घेतल्याने मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार बरखास्त झाले. तर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी देखील मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे तत्कालीन राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
Farooq Abdullah on President's rule being imposed in Jammu and Kashmir: I think Governor and President's rule must come to an end. There should be elections. People must choose their representatives who can work. pic.twitter.com/D7nNbIpbCM
— ANI (@ANI) December 19, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.